नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल पंपावर केंद्र सरकारच्या योजनांची जाहिरात करणाऱ्या होर्डिंगवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो आहे. हे होर्डिंग ७२ तासांत हटविण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पेट्रोल पंपांना दिले आहेत. आचारसंहितेचे उल्लंघन  होत असल्याने ही कार्यवाही करण्यात आली. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरी या पाच राज्यांच्या निवडणूक तारखांची घोषणा  झाली आहे.  त्यानंतर तृणमूल काँग्रेसने याबाबत  तक्रार केली होती.

 

तृणमूल काँग्रेसने कोरोना लसीकरण मोहिमेच्या पोस्टर आणि व्हिडीओंमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर करण्यावरुन आक्षेप घेतला आहे. यावरही कोरोना लसीकरण मोहिमेच्या प्रचारात वापरण्यात आलेला मोदींचा फोटोही हटवण्याचे आदेश दिले आहेत.  दरम्यान,  भाजपनेही तृणमूल काँग्रेसविरोधात निवडणूक आय़ोगाकडे तक्रार केली आहे. आचारसंहिता लागू झालेली असतानाही पश्चिम बंगालमधील दोन मंत्री मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासन देत आहेत, असा आरोप केला होता.  या दोन्ही मंत्र्यांना विधानसभा निवडणूक लढविण्यापासून रोखावे, अशी मागणी  भाजपने केली आहे. तर तृणमूल काँग्रेसने या आरोपांचे खंडन केले आहे.