भुदरगड तालुक्यातील उर्वरीत सरपंच निवडी २६ फेब्रुवारीला : दौलत देसाई

0
53

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आरक्षणावरुन प्रलंबीत राहिलेल्या भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीची पहिल्या टप्प्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी २५ फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती. उर्वरीत २९ ग्रामपंचायतीची सरपंच पदांचे आरक्षण निश्चित करून त्याची तारीख २६ फेब्रुवारी निश्चित केली आहे. याबाबतचे परिपत्रक जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज (सोमवार) प्रसिद्ध केले.