कूर,कोनवडे,शेणगांवच्या पुरग्रस्तांचे तीन टप्यात पुनर्वसन : ना. सतेज  पाटील

0
127

गारगोटी (प्रतिनिधी) : कूर, कोनवडे, शेणगांवच्या पुरग्रस्त कुटुंबांचे तीन वर्षात १०० टक्के पुनर्वसन करणार असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले. ते भुदरगड तालुक्यातील पूरग्रस्त गावांच्या पाहाणी दौऱ्यावेळी बोलत होते. यावेळी पडलेल्या घरांची जागा लेखी स्वरूपात शासनाकडे वर्ग करून घेणार असल्याचेही ना. पाटील यांनी सांगितले.

पालकमंत्री म्हणाले की, शेणगांव पुनर्वसनासाठी जागा उपलब्ध नसतानाही ती जागा अन्य मार्गातून उपलब्ध करून देवू. पण कोणत्याही परिसिस्थीत पुनर्वसन करू, असे आश्वासन ना. पाटील यांनी दिले.

सरपंच सुरेश नाईक म्हणाले की, शेणगांवच्या ९४ घरात पाणी गेले होते. यातील ७५ घरांना स्थलांतराचे आदेश झाले आहेत. ३८ घरांची पुर्णता पडझड झाल्यामुळे ही घरे राहाण्याच्या योग्यतेची नाहीत. भुदरगड तालुक्यात सर्वाधिक नुकसान शेणगांव ग्रामस्थांचे झाल्याचे त्यांनी सांगितेल.

या पाहाणी दौऱ्यावेळी माजी आ. के. पी. पाटील, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, सत्यजीतराव जाधव, प्रांत संपत खिलारी, तहसिलदार अश्वीनी वरूटे, गटविकास अधिकारी सारिका पोवार,पं. स.चे उपसभापती अजित देसाई, कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष शामराव देसाई, बाजार समिती संचालक सचिन घोरपडे, ग्रामस्थ आदी उपस्थीत होते.