कोल्हापूर (प्रतिनिधी) :  दि. २० सप्टेंबर ते शुक्रवार  दि. २४ सप्टेंबर २०२१  अखेर शहरातील १८ वर्षावरील नागरीकांचे लसीकरण केंद्रावर रजिस्टेशन करुन लसीकरण केले जाणार असल्याचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी सांगितले.

कोव्हिशिल्डच्या डोसकरीता रोज  ५०० नागरीकांना कुपन देऊन  सर्व नागरी प्राथमिक आरोग्य  केंद्र तसेच भगवान महावीर दवाखाना, विक्रमनगर  आणि द्वारकानाथ कपूर दवाखाना कदमवाडी येथे लसीकरण करण्यात येणार आहे. यावेळी प्रथम येणाऱ्या या नागरीकांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येणार असून ५०० पेक्षा अधिक नागरीक लसीकरणासाठी उपस्थित राहिलेस त्यांना कुपन देऊन दुस-या दिवशी लसीकरणास बोलविण्यात येणार आहे.

नागरीकांनी लसीकरणास येताना सोबत आधार कार्ड आणि फोटो आयडी असलेले कोणतेही ओळखपत्र घेऊन यावे. तरी या मोहिमेत १८ वर्षावरील नागरीकांनी जास्तीत जास्त नोंदणी करुन लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन डॉ. बलकवडे यांनी केले आहे.