रस्ता डांबरीकरण करण्याबाबत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन

0
149

कोल्हापूर (प्रतिनिधी) : आज ‘ई’ वार्ड, ताराबाई पार्क प्रभाग क्रमांक ११-न्यू शाहूपुरी येथील पर्ल हॉटेल ते चर्च चौकापर्यंत खराब झालेला रस्ता डांबरीकरण करण्याबाबत आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देण्यात आले.

न्यू शाहूपुरी पर्ल हॉटेल ते चर्च चौकापर्यंतचा रस्ता हा गेल्या वर्षी ड्रेनेज लाईन करीता खोदण्यात आला होता. येथील नागरिकांनी एक वर्ष चांगल्या पध्दतीने सहनशीलता दाखवून ड्रेनेजच्या कामास सहकार्य केले. या ठिकाणचे गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेले ड्रेनेजचे काम आता पूर्ण होत आले आहे, पण सध्या या रस्त्याची परिस्थिती खूपच बिकट झाली आहे. वारंवार अपघात होत आहेत. यामुळे सदरचा रस्ता करणे हे अत्यावश्यक बनले आहे.

याबाबत चे निवेदन आज (शनिवार) आयुक्त डॉ. कांदबरी बलकवडे यांना देण्यात आले. तसेच प्रत्यक्ष पाहणी करण्याकरीता न्यू शाहूपुरी येथे यावे आणि रस्त्याचे मंजूर असणारे काम कोणतेही आर्थिक किंवा तांत्रिक सबबीमुळे थांबू नये तसेच रस्त्याचे काम त्वरित व्हावे.  यासाठी आयुक्त यांनी स्वतः लक्ष घालावे अशी, भागातील नागरिकांच्या वतीने विनंती करण्यात आली.

यावेळी नगरसेवक रत्नेश शिरोळकर, प्रशांत जाधव, मिरासो जमादार, सचीन समुद्रे, शरद बनसोडे, अभिजित भोसले, निलेश भोसले, गुलाबराव देशमुख, वैभव कबाडे, सागर बोडेकर आणि प्रभागातील नागरिक उपस्थित होते.