शतकोटी लसीकरणात देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब : पंतप्रधान

0
5

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातील १०० कोटी लसीचे डोस हे केवळ आकडे नाहीत. हे देशाच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. इतिहासाचा नवा अध्याय तयार होत आहे, असे प्रतिपादन  पंतप्रधान मोदी यांनी केले. पंतप्रधानांनी आज (शुक्रवार) सकाळी  राष्ट्राला संबोधित केले.

कोरोना विषाणूविरूद्धच्या युद्धात भारताने केवळ नऊ महिन्यांत १०० कोटींहून अधिक लसीकरण करून एक नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कृतं मे दक्षिणे हस्ते जयो मे सव्य आहितः या गोष्टीला भारताच्या संदर्भात पाहिले तर साधा अर्थ असा की आपल्या देशाने एका बाजूला कर्तव्याचे पालन केले. तर दुसरीकडे मोठे यश देखील मिळाले. २१ ऑक्टोबर रोजी १०० कोटींच्या लसींच्या डोसचे कठिण पण विलक्षण लक्ष प्राप्त केले आहे. यामागे देशातील १३० कोटी नागरिकांची शक्ती आहे. यामुळे हे यश भारताचे आहे. मी यासाठी सगळ्यांचे अभिनंदन करतो.

देश आणि परदेशातील तज्ञ आणि अनेक संस्था भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल खूप सकारात्मक आहेत. आज भारतीय कंपन्यांमध्ये केवळ विक्रमी गुंतवणूक येत नाही तर तरुणांसाठी रोजगाराच्या नवीन संधीही निर्माण होत आहेत. स्टार्ट-अपमध्ये विक्रमी गुंतवणुकीमुळे, स्टार्ट-अप रेकॉर्ड बनवत आहेत,  असेही मोदी म्हणाले.