इचलकरंजी (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने उद्योग आणि सेवा या सार्वजनिक क्षेत्रातील खासगीकरण रोखावे. तसेच जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ कमी करावी. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांना आज (सोमवार) निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, आज देशभरातील कामगार संघटनांच्या कृती समितीच्या वतीने खासगीकरण विरोधी दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवांचे खासगीकरण थांबवून थेट विक्री आणि विदेशी गुंतवणूक व निर्गुंतवणूक धोरण रद्द करावे, शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत, कामगार विरोधी कायदे रद्द करावेत, शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करावे, जीवनावश्यक वस्तूंच्या करामध्ये कपात करुन अनुदानात वाढ करावी, आदी मागण्या करण्यात आल्या.

यावेळी कामगार नेते धोंडीबा कुंभार, गीता हजारे, निलम लिपारे, गंगुताई माने, उज्वला तोडकर, अश्विनी खानाज, संगिता पिसे, रेणुका गुंडी, विद्या सवाईराम, सुजाता गायकवाड आदी उपस्थित होते.