केंद्राच्या विविध विभागात ५ हजार पदांची भरती सुरू..

0
109

कोल्हापूर (प्रतिनिधी) : केंद्र सरकारच्या विविध विभागात ५ हजार पदांची भरती होत आहे. यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून सरकारी नोकरीसाठी जाहिरात निघाली आहे. ६ नोव्हेंबरपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. वयाची १८ वर्ष पूर्ण तसेच बारावी परीक्षा उत्तीर्ण असलेला कोणताही उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करू शकतो.

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून होणाऱ्या या परीक्षेत केंद्र सरकारच्या विविध मंत्रालय, विभाग आणि कार्यालयामधील विविध पदांसाठी भरती होणार आहे. १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. लोअर डिव्हिजन लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक, पोस्टल सहाय्यक, सॉर्टिंग सहाय्यक आणि डेटा एंट्री ऑपरेटर पदांसाठी भरती होणार आहे. अर्ज दाखल करण्याची तारीख ६ नोव्हेंबर २०२० अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२० आहे. या विविध पदांच्या सविस्तर माहितीसाठी अधिकृत वेबसाईट https://ssc.nic.in वर मिळू शकते.