शहरात थकीत पाणी बिलाची वसुली जोरात..

0
65

कोल्हापूर (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा वसूली पथकांनी काल (सोमवार) कोल्हापूर शहरातील मनिषानगर, साळोखेपार्क, मंडलिक वसाहत परिसरातून १ लाख २२ हजार ६२५ रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले. तसेच राजारामपुरी, राजेंद्रनगर परिसरातून १ लाख ९ हजार ४०२ रुपयांची वसूली केली असून एकूण २ लाख ३२ हजार २७ रुपयांचे थकीत पाणी बिल वसूल केले असल्याची माहिती शहर पाणी पुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख अमर बागल यांनी दिली. ही कारवाई पाणी पुरवठा विभागाचे वसुली पथक प्रमुख अमर बागल, मिटर रिडर रणजित संकपाळ, किशोर यादव, संदीत कांबळे विश्वास कांबळे यांनी सहभाग घेतला.

थकीत पाणी बिलासाठी या पथकाने या परिसरातील थकबाकीदारांची ४ पाणी कनेक्शन बंद केली आहेत. तसेच राजारामपुरी, राजेंद्रनगर परिसरातील २ पाणी कनेक्शन खंडित करुन थकबाकीपैकी  ही कारवाई मिटर रीडर रमेश मगदूम, संदीप माळी, बजरंग शिंगाडे आणि फिटर तानाजी माजगांवकर यांच्या पथकाने केली.

थकीत पाणी बिलाच्या वसूलीसाठी यापुढेही विशेष पथकामार्फत कारवाई करण्यात येणार असल्याने नळ कनेक्शन धारकांनी आपले थकीत व चालूचे पाणी बिल तात्काळ भरुन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महानगरपालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागाचे जल अभियंता नारायण भोसले यांनी केले आहे.