संभाजीनगर बसडेपोच्या रेकॉर्डरुमला आग : कागदपत्रे भस्मसात

0
100

कोल्हापूर (प्रतिनीधी) : कोल्हापुरातील संभाजीनगर येथील एसटी डेपोच्या रेकॉर्डरुमला आज (मंगळवार) अचानक सायंकाळी ६ च्या सुमारास शॉर्टसर्किटने आग लागल्याने येथील सर्व कागदपत्रे जळून खाक झाली. दरम्यान, महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत ही आग आटोक्यात आणली.

संभाजीनगर येथील बसस्थानकाच्या रेकॉर्डरूमला आज सायंकाळी अचानक शॉर्टसक्रिटने आग लागली. रेकॉर्डरूममध्ये कागदपत्रे असल्याने आगीने रौद्ररुप धारण केले. तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे तीन बंब घटनास्थळी दाखल होवून या पथकातील २० जवानांकडून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. तर यामध्ये अनेक वर्षांचे जुने रेकॉर्ड जळून खाक झाले.