पन्हाळा (प्रतिनिधी) : पन्हाळा येथील संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचे तंत्रज्ञान विकसित होवून त्यांचे करियर घडावे. त्यांना चांगली नोकरी मिळावी यासाठी पुणे येथील जीटीटी फौंडेशन कंपनीशी सामंजस्य करार केला असल्याची माहिती संजीवन संस्थेचे चेअरमन पी आर. भोसले यांनी दिली आहे.

जीटीटी फौंडेशन कंपनीशी झालेल्या सामंजस्य करारानुसार महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना पूर्ण वर्षभर ट्रेनिंग दिले जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांची जीवन कौशल्य, नोकरी कौशल्य, उद्योजक कौशल्य, अॅप्टीट्युड (योग्यता) अशा प्रकारची औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असणारी कौशल्याचे ट्रेनिंग दिले जाणार आहे. गेली तीन महिने या करारानुसार विद्यार्थ्यांना ट्रेनिंग चालू असून आत्तापर्यंत एकूण ७०० विद्यार्थ्यांनी ट्रेनिंग घेतले आहे.

या ट्रेनिंगचा विद्यार्थ्यांना फायदा होत असून यामुळे कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांची वेगवेगळ्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड देखील झाली असल्याचे कॉलेजचे प्राचार्य डॉ. मोहन वनरोट्टी यांनी यावेळी सांगितले. तसेच या कंपनीचे ट्रेनिंग पुढील नऊ महिने असेच चालू राहणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांची १०० टक्के प्लेसमेंट होण्यास मदत होणार आहे.

यावेळी संस्थेचे सहसचिव एन. आर. भोसले, सीईओ प्राची भोसले जीटीटी फौंडेशनचे राहुल रॉय, राहुल पवार, अमित भोसले उपस्थित होते.