मुस्लिम बोर्डिंग येथे मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत नमाज पठण…

0
28

कोल्हापूर (प्रतिनिधी) : त्यागाचे प्रतीक म्हणून साजरी केली जाणारी बकरी ईद आज (बुधवार) संपूर्ण देशात साजरी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांनी घरीच ईद साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील मुस्लिम बोर्डिंग इथं पाच लोकांच्या उपस्थितीतच मौलाना मोबीन यांनी नमाजाचे आणि खुदबा पठण केले.

कोरोना प्रादुर्भावामुळे कोणालाही सामुदायिक नमाज पठण करता आले नाही. यावेळी कोरोना प्रादुर्भाव लवकर कमी होऊ दे, सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना करण्यात आली. यावेळी कुस्तीचे प्रशासक कादरभाई मलबारी, समाजिक कार्यकर्ते आश्किन गणी आजरेकर आणि मुस्लिम बोर्डिंगचे संचालक उपस्थित होते.