कुंभोज (प्रतिनिधी) : कुंभोज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या युवकांचा सत्कार वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी संजय कुरणे, समीर भोकरे, ग्रा. पं. सदस्य अजित देवमोरे, अविनाश चव्हाण यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी अपंग खेळाडू अविनाश चव्हाण याला प्रा. संजय कदम यांनी पाच हजार रुपयांची देणगी बहाल केली. तसेच या युवकांनी कुंभोजच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला असून, कुंभोजचे पुन्हा एकदा नावलौकिक झाले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण त्यांना लागेल ते सहकार्य करु असे मत अरुण पाटील यांनी व्यक्त केले.

यावेळी जंबू भोकरे, अजित गोपुडगे, चाँद मुजावर, आप्पासाहेब पाटील लखन भोसले, बंडू कत्ते, विनायक पोतदार, अनिल कोरे, प्रमोद चौगुले, सुकुमार पाटील, अमर बडंगर, मनोज वाईकर आदी उपस्थित होते.