कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (बुधवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात १९ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात १४ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ३८६ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६ वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील ५, आजरा तालुक्यातील २,  भूदरगड तालुक्यातील २, गडहिंग्लज तालुक्यातील २, करवीर तालुक्यातील २, शाहूवाडी तालुक्यातील २, इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील २ आणि इतर जिल्ह्यातील २ अशा एकूण १९ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर शाहुवाडी तालुक्यातील १ आणि हातकणंगले तालुक्यातील १ अशा एकूण २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,७९२.

एकूण डिस्चार्ज : ४६,५२५.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ५९७.

एकूण मृत्यू : १६७०.