कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात काल सायंकाळी ५ पासून आज (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत चोवीस तासात ४४ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान दिवसभरात ५६ जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच ४०९ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

आज सायंकाळी ६:३० वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार गेल्या चोवीस तासात कोल्हापूर शहरातील २३, आजरा तालुक्यातील १,  भूदरगड तालुक्यातील ५, चंदगड तालुक्यातील १,   हातकणंगले तालुक्यातील ३, कागल तालुक्यातील १, करवीर तालुक्यातील १, पन्हाळा तालुक्यातील १, शाहूवाडी तालुक्यातील १, राधानगरी तालुक्यातील १, शिरोळ तालुक्यातील २,  इचलकरंजी सह नगरपालिका क्षेत्रातील १ आणि इतर जिल्ह्यातील ३ अशा एकूण ४४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर वाळवा तालुक्यातील आष्टा येथील एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ५६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आज अखेर जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या : ४८,७७३.

एकूण डिस्चार्ज : ४६,५११.

उपचारासाठी दाखल रुग्ण : ५९४.

एकूण मृत्यू : १६६८.