‘आप’तर्फे संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन

0
77

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने बिंदू चौक येथे संविधान वाचनाचा कार्यक्रम उत्साहात झाला. यावेळी पक्षाच्या वतीने संविधानाच्या उद्देशिकेचे सार्वजनिक वाचन करण्यात आले.

भारतीय संविधानास अभिप्रेत असलेल्या समता, बंधुता व स्वातंत्र्याची मूल्ये घरोघरी पोहचवण्याचा निर्धार  करण्यात आला. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष नीलेश रेडेकर, उत्तम पाटील, अभिजित कांबळे, संजय साळोखे, विजय हेगडे, दुश्यंत माने, अॅड. चंद्रकांत पाटील, अॅॅड. रणजित कवाळे, भाग्यवंत डाफळे, मयूर भोसले, रवींद्र राऊत, अमरसिंह दळवी, सचिन वणीरे, समीर लतीफ आदी उपस्थित होते.