जिल्हापरिषदेत भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन..

0
60

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्हापरिषदेमध्ये आज (गुरूवार) २६ नोव्हेंबर संविधान दिन सकाळी ११ वाजता पार पडला. यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे वाचन करण्यात आले. यावेळी २६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तसेच बी. पी. माळवे सहा. शिक्षक यांनी ‘संविधान दिन’ विषयी संपूर्ण माहिती दिली. याप्रसंगी सर्वांनी मास्क परिधान करुन सोशल डिस्टनसिंग पाळून मर्यादीत संख्येने अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

याप्रसंगी अजयकुमार माने (अति. मुख्य कार्यकारी अधिकारी), मनीषा देसाई (उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा. प्र. वि.)), राहुल कदम (प्रभारी मुख्य लेखा व वित्त अधिकारी), अरुण जाधव (उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.)), दिपक घाटे (समाज कल्याण अधिकारी), चंद्रकांत सुर्यवंशी (कृषी विकास अधिकारी) आदी उपस्थित होते.