मुंबई  (प्रतिनिधी) : आधार कार्डला पॅन कार्डशी जोडण्यास पुन्हा एकदा केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. आता पॅन कार्ड, आधार कार्डशी ३१ मार्च २०२२ पर्यंत लिंक करता येणार आहे. याबाबतची नवीन अधिसूचना आयकर विभागाने  जारी केली आहे.  

पॅन-आधार लिंक  करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर होती.  आयकर विभागाने  पॅनला आधारशी लिंक न केल्यास १० हजार रुपयांच्या  दंडाची तरतूद केली होती.    मात्र,  नवीन अधिसूचना जारी केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. परंतु    ३१ मार्चपर्यंत पॅन-आधार लिंक न केल्यास  दंड आकारणी होण्याची शक्यता आहे.

आपले पॅन कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी, आपण प्रथम www.incometaxindiaefiling.gov.in या वेबसाइटला भेट द्या.

या वेबसाईटमध्ये तुम्हाला ‘लिंक आधार’ चा पर्याय दिसेल.

या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज उघडेल.

येथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक, पॅन कार्ड क्रमांक आणि तुमची काही वैयक्तिक माहिती भरावी लागेल.

यानंतर, ‘सबमिट’च्या बटणावर क्लिक करताच तुमचे पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक होईल.