राज्यातील ग्रंथालयांच्या फेर तपासणीबाबत फेर विचार करावा : बी.जी. देशमुख

0
348

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  कोरोनामुळे राज्यातील ग्रंथालय गेली दोन वर्षे झाली बंद पडली आहेत. ग्रंथालये आणि कर्मचाऱ्यांची  दुरावस्था झाली आहे. तरीही शासनाने ग्रंथालयांच्या फेरतपासणीचा घाट घातला आहे.  याबाबत राज्य शासनाला ग्रंथालयांची नेमकी स्थिती निदर्शनास आणून देण्याबाबत विचार विनिमय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेनेचे राज्याध्यक्ष बी.जी. देशमुख कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी जिल्हा व राज्य कार्यकारिणीची बैठक घेऊन घेऊन चर्चा केली. यावेळी या सर्व पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेचे खा. धैर्यशील माने यांचीही भेट घेतली.

यावेळी बी.जी. देशमुख म्हणाले की, राज्यातील जी ग्रंथालये सक्षम आहेत ती तपासणीला सामोरे जाऊ शकतील. पण अडचणीतील ग्रंथालयांची अवस्था आणखी दयनीय होणार आहे. म्हणूनच फेरतपासणीसाठी अशा ग्रंथालयांना तयारीसाठी वेळ मिळाला पाहिजे. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे आहे. यावेळी खा. धैर्यशील माने यांनी ग्रंथालयाच्या समस्यांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

यावेळी राज्य उपप्रमुख रवींद्र धुमाळ,  विजय पोकळे, राजेश मोरे, अशोक यादव, जिल्हाध्यक्ष उमेश तोडकर, जिल्हा सचिव प्रदीप पाटील, हातकणंगले तालुकाध्यक्ष बाळासाहेब लोहार, भरत कुंभार, विनायक पाटील, राजाराम विभुते, पन्हाळा तालुकाप्रमुख, शाहुवाडी तालुकाप्रमुख उपस्थित होते.