रविकांत आडसूळ यांनी स्वीकारला महापालिका उपायुक्तपदाचा कार्यभार

0
116

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिकेच्या उपायुक्तपदी रविकांत आडसूळ यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी आज (बुधवार) पदाचा कार्यभार स्वीकारला.

रविकांत आडसूळ यांनी यापूर्वी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सांगली जिल्ह्यातही काम केले आहे. ते मूळचे करवीर तालुक्यातील निगवे येथील असून त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये आपल्या कामाची छाप उमटवली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांची कोल्हापुरातून बदली झाली होती. आता महापालिकेच्या उपायुक्तपदी रुजू झाले आहेत.