दिल्ली (वृतसंस्था) : भारताचे प्रथम नागरिक असणारे राष्ट्रपती यांचे निवासस्थान म्हणजे राष्ट्रपती भवन राष्ट्रपती भवन हे नवी दिल्ली येथे आहे. राष्ट्रपती भवन हे अतिशय सुंदर आणि भव्य आहे. राष्ट्रपती भवनाच्या आत जाण्याची अनेकांची इच्छा असते. आता १ डिसेंबरपासून राष्ट्रपती भवनाचे दरवाजे सर्वसामान्यांसाठी ही खुले झाले आहेत.

आठवड्यातील बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी राष्ट्रपती भवन सर्वसामान्यांसाठी खुले असणार आहे. राष्ट्रपती भवनमध्ये दरबार हॉल, अशोका हॉल, बँक्वेट हॉल, मार्बल म्युझिक हॉल हे सर्व पाहता येणार आहे.