कासारवाडी येथे सापडले दुर्मिळ उदमांजर…

0
1149

टोप (प्रतिनिधी) :  कासारवाडी येथे आज (शुक्रवार) सायंकाळी रमाबाई आंबेडकर सूतगिरणी येथील एका बिल्डिंगमध्ये दुर्मिळ उदमांजर सापडले. याला प्राणीमित्र किरण चौगुले यांनी जंगलात सोडून जीवदान दिले.

रमाबाई आंबेडकर सूतगिरणीमध्ये दुर्मिळ असणारे उदमांजर (एशियन पाम सिवेट) आले होते. यावेळी भटकंती करत हे उदमांजर बिल्डिंगमध्ये सुरक्षित आसऱ्यासाठी आले असावे, अशी माहिती किरण चौगुले यांनी दिली. त्यांनी या मांजराला कोणतीही इजा होऊ न देता पकडून वन विभागाला कळवले आणि त्यांच्या सूचनेनुसार जंगलात सोडून दिले.