इचलकरंजीत पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ…

0
354

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीमध्ये पडत असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ होताना दिसत आहे. परिसरातील ओढे, नाले ओसांडून वाहू लागले आहेत. आज (गुरुवार) पंचगंगेची पाणी पातळी ६१ फूट इतकी झाली आहे. यामुळे खबरदारी म्हणून नदीवर लहान पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

इचलकरंजी येथील पंचगंगा नदीची इशारा पातळी ६८ फूट इतकी आहे. तर धोका पातळी ७१ फूट इतकी आहे. सध्या असाच पाऊस सुरु राहिला तर लवकरच पंचगंगा नदीला पूर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  दरम्यान, नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा आपत्ती व्यवस्थापनाने दिला आहे.