रांगोळीच्या ‘माहिम’ला राज्यस्तरीय किक बॉक्सिंगमध्ये सिल्व्हर पदक               

0
212

रांगोळी (प्रतिनिधी) : येथील माहिम दस्तगीर मुल्लाणी याने अहमदनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत सिल्व्हर पदक पटकावले. यामुळे त्याची कलकत्ता येथे होणा-या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा प्रतिनिधि म्हणून निवड झाली.

माहिम रांगोळी येथील मुल्लाणीवाडी येथे राहतो. अत्यंत शांत व संयमी असुन गरीब कुटुंबातील आहे. आई अंगणवाडी कर्मचारी व वडिल यंत्रमाग कामगार म्हणून काम करतात. घरच्या परिस्थितीमुळे माहिमने १२ वी नंतर एका खाजगी कंपनीमध्ये नोकरीस सुरवात केली. पोलीसदलात किंवा आर्मीमध्ये जाण्याची त्याची  इच्छा असल्याचे वडीलांना सांगितले. पहिल्या पासुन बॉक्सिंगची आवड असलेमुळे घरात उशीला दोरी बांधून त्यावर बॉक्सिंगची प्रॅक्टिस करत असे. माहिमची बॉक्सिंग बदल असणारी आवड पाहून वडिलांनी त्याला फोर्स करिअर ॲकॅडमी कुंभोज येथे सरावासाठी प्रवेश घेतला. गेले दोन महिने माहिम प्रशिक्षक संभाजी बन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली बॉक्सिंग शिकत आहे.

कोल्हापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत त्याने सिल्वर पदक पटकावले होते. या विजयामुळे त्याची अहमदनगर येथील राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड झाली. जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर या राज्यस्तरीय स्पर्धेत सुद्धा माहिमने सिल्वर पदक पटकाविले. यामुळे कलकत्ता येथे होणा-या राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा प्रतिनिधि म्हणून त्याची निवड करणेत आली.

अहमदनगर हुन माहिम आज रांगोळी मध्ये आला. यावेळी त्याची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. माहिमच्या मित्र परवाने गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. गावांमध्ये जागोजागी माहिमचे हार व  पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. माहिमने या यशाचे श्रेय आपले आई-वडील, मामा  व प्रशिक्षक यांना दिले.