रांगोळी ग्रा. पं. कार्यालयात टाकला गटारीतील कचरा

0
438

रांगोळी (प्रतिनिधी) :  रांगोळीमधील माळभाग परिसरात कित्येक दिवसापासून ग्रामपंचायतीने गटारामधील स्वच्छता केलेली नाही.  त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली होती. याबद्दल ग्रामपंचायतीला सूचना देऊनही दखल घेतली नसल्यामुळे आज (मंगळवार) नागरिकांनी  गटारीतील कचरा पंचायतीच्या कार्यालयामध्ये आणून टाकला.

याबाबत सरपंच यांनी सांगितले की, लवकरात लवकर गटार स्वच्छ करण्यात येईल.  ज्या लोकांनी गटारातील कचरा कार्यालयात आणून टाकला आहे. त्यांनी ही घटना अनावधानाने घडली असल्याचे  सांगून टाकलेला कचरा स्वतः काढून घेऊन स्वच्छता करून घेतली.