कोल्हापूर (प्रतिनिधी) :येथील राजर्षी शाहू गव्हर्न्मेंट सर्व्हटस् को-ऑप. बँकेच्या तज्ज्ञ संचालकपदी पाटबंधारे विभागाचे रामदास कृष्णा कोकितकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेचे अध्यक्ष शशिकांत तिवले यांनी नियुक्तीचे पत्र दिले आहे.

अध्यक्ष तिवले यांनी कोकितकर यांच्या कार्याचा आढावा घेतला. नूतन तज्ज्ञ संचालक कोकितकर यांचा बँकेचे संचालक रवींद्र पंदारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालक बांदिवडेकर यांनी कोकितकर यांच्या अनुभव कौशल्याचा बँकेस फायदा होईल, असे सांगितले.

यावेळी उपाध्यक्ष रमेश घाटगे, मधुकर पाटील, अतुल जाधव, विलासराव कुरणे, सदानंद घाटगे, अजित पाटील, हेमा पाटील, मनुजा रेणके. संजय खोत, किशोर पोवार, अरविंद आयरे, दिलीप मिरजे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे उपस्थित होते.