कोल्हापुरात शनिवारी संविधान दिनानिमित्त रॅली

0
44

कोल्हापूर (प्रतिनिधी) : संविधान दिनानिमित्त सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिन साजरा करण्यात येणार असून, सकाळी ८.३० वाजता बिंदू चौक येथून निघणाऱ्या या रॅलीत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

रॅली छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- महानगरपालिका- गगांराम कांबळे यांची समाधी असे मार्गक्रमण करुन पुढे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय चौकातून- दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समारोप होणार आहे. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डी. टी. शिर्के, आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत सकाळी ८.३० बिंदू चौक येथे भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात येणार आहे.