कोल्हापूर (प्रतिनिधी) : सन २००५ सालापासून चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळने सहकार्य केलेल्या निराधार महिलांकडून स्वतः आणि सहकारी संचालकांना रक्षाबंधनानिमित्त राखी बांधून घेण्याचा पायंडा गेली १६ वर्ष जपलेला आहे. यावेळी आज (रविवार) ग्रा‍मविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आ. राजेश पाटील यांना रक्षाबंधनानिमित्त येथील श्रीमती भारती चिंचणे, श्रीमती वैशाली शिंदे यांच्याकडून राख्या बांधण्यात आल्या.

यावेळी श्रीमती वैशाली शिंदे यांनी, आज मला ना. हसन मुश्रीफ आणि ना. सतेज पाटील यांच्‍या रूपाने नविन जेष्‍ठ भाऊ मिळाले आहेत. त्‍यांचे अशिर्वाद माझ्यासारख्‍या अनेक निराधार महिलांना लाभले आहेत. गोकुळचे हे ऋण या जन्मी न फिटणारे आहे. यामुळे मी माझ्या परिवाराचे पालनपोषण चागंल्या प्रकारे करू शकले याचे मला समाधान असल्याचे सांगितले.

भारती चिंचणे म्हणाल्या की, माझे पती २००५ च्या महापुरात वाहून गेले. राहते घर आणि जनावरे देखील या पुरात वाहून गेलीत. यावेळी चेअरमन विश्वास पाटील यांनी मला घर बांधण्यासाठी गोकुळ मार्फत आर्थिकसहाय्य करून जीवनात जगण्याची उमेद निर्माण केली.

यावेळी राज्‍याचे जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी  पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, सर्व संचालक, अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.