राजवर्धनसिंह कदम बांडे यांचे छ. शाहू महाराजांना अभिवादन

0
65

कोल्हापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शाहू महाराजांचे पंतू आणि धुळ्याचे माजी आमदार राजवर्धनसिंह कदम बांडे यांनी कोल्हापुरात नर्सरी बागेतील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळास आज (बुधवार) भेट देऊन त्यांना अभिवादन केले.

यावेळी शाहू महाराजांच्या समाधीला विविध मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करुन छत्रपती ‘शाहू महाराज की जय’, जय शिवाजी, जय भवानी, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी अनिल कदम, पीटर चौधरी, नितीन पाटील, रवी मोरे, पद्माकर कापसे आदी उपस्थित होते.