इंधन दरवाढीविरोधात राज्यभर आंदोलनाचा भडका उडवणार : राजू शेट्टी  

0
48

कोल्हापूर (प्रतिनिधी) : पेट्रोल, डिझेल, गॅस, वीज दरवाढीच्या निषेधार्थ केंद्र सरकार विरोधात आणि कोरोना काळातील शैक्षणिक फी वसूल करणाऱ्या शिक्षण सम्राटांविरोधात राज्यभरात आंदोलनाचा भडका उडवणार असल्याची घोषणा  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज (बुधवार) केली. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.