कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सरकारने सर्वसमावेशक बांधकाम नियमावलीला  नुकतीच मंजुरी दिलेली आहे. ही नियमावली मंजुरी व्हावी, यासाठी क्रिडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष राजीव परीख यांनी सतत पाठपुरावा केला होता. त्याबद्दल परीख यांचा ज्येष्ठ सभासद प्रविणराजे घाटगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  

सर्वसमावेशक बांधकाम नियमावली मंजूर प्रक्रियेला बराच कालावधी लागला होता.  पण ती परिपूर्ण व्हावी व लवकर जनतेसाठी उपयोगात यावी, यासाठी राजीव परीख यांनी अथक प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून ही नियामावली मंजूर करण्यात आली. त्याबद्दल क्रिडाई कोल्हापूर या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनेच्या मासिक सभेत परीख यांचा सत्कार करण्यात आला.

खजानिस गिरीष रायबागे, सहसचिव महेश यादव, आर्किटेक्ट प्रविण पाटील, प्रशांत कापडी, संभाजी पाटील यांचेही या कामी मोलाचे योगदान लाभले. त्यांचाही सत्कार श्रीनिवास गायकवाड, प्रकाश मेडशिंगे व अध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, सचिव रविकिशोर माने यांच्यासह क्रिडाई कोल्हापूरचे सभासद उपस्थित होते.