शिरोळच्या पंचायत समितीच्या उपसभापती पदी राजगोंडा पाटील…

0
137

शिरोळ (प्रतिनिधी) : शिरोळच्या पं. स. उपसभापती पदी राजगोंडा पाटील यांची आज (बुधवार) निवड करण्यात आली. ही निवड प्रकिया गटविकास अधिकारी शंकर कवीतगे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राजगोंडा पाटील यांचा सत्कार पं. स. सभापती कविता चौगुले आणि सदस्यांच्या वतीने करण्यात आला.

राजगोंडा पाटील यांनी, सदस्यांचे आभार मानत सर्व सदस्यांना विश्वासात घेऊनच काम केलं जाणार असल्याचे सांगितले. तसेच डॉ. राजेंद्र पाटील- यड्रावकर, गणपतराव पाटील, सावकार मदनाईक आणि उल्हास पाटील यांचे आभार मानले.

यावेळी माजी सभापती मल्लाप्पा चौगुले, मीनाज जमादार, संजय माने सचिन शिंदे, दिपाली परीट, अर्चना चौगुले, मीनाक्षी कुरडे, सदस्य, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.