कोल्हापूर (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूकीची प्रक्रिया सुरू झाल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्ष सक्रिय झाले आहेत. आज (मंगळवार) शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषद घेवून पालकमंत्री आणि काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. आम्ही कोणाच्या कार्यक्रमाची भाषा करणार नाही, असे म्हणत क्षीरसागर यांनी पाटील यांच्यावर बोचरी टीका केली.

महिन्यापूर्वी कसबा बावड्यात पालकमंत्री पाटील यांच्या उपस्थितीत मेळावा झाला. त्या मेळाव्यात पाटील यांनी क्षीरसागर यांच्या महापालिका निवडणुकीच्या राजकीय वाटचालीवर भाष्य केले. त्यानंतर क्षीरसागर यांनीही आक्रमकपणे पाटील यांच्यावर आरोप करू लागले. आज झालेल्या पत्रकार परिषदेतही क्षीरसागर यांनी नाव घेता पाटील यांनाच लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले.