विधानपरिषदेसाठी राजेश क्षीरसागर यांचे नाव चर्चेत !

0
110

कोल्हापूर (प्रतिनिधी) : राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी इच्छुकांची यादी अंतिम करण्याच्या घडामोडी पक्षीय पातळीवर वेगावल्या आहेत. शिवसेनेकडून शहरातील शिवसेनेचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचेही नाव आता चर्चेत आले आहे. यामुळे शहरातील शिवसैनिकांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या प्रमुख पक्षातर्फे राज्यपाल नियुक्त आमदारपदासाठीची नावे निश्चित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे. तिन्ही पक्षांकडून अनेक नावे अनपेक्षितरित्या पुढे येत आहेत. शिवसेनेकडून क्षीरसागर यांचेसह माजी आमदार सुनील शिंदे, युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, राहूल कनाल, आदेश बांदेकर यांची आमदारकीसाठी नावे चर्चेत आली आहेत.