राजर्षी छत्रपती शाहू, आचार्य अत्रे पुरस्काराचे उद्या वितरण

0
37

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  जिल्हा परिषदेच्या वतीने उत्कृष्ट कामकाज करणाऱ्या जि. प. आणि पं. स. सदस्य व कर्मचारी यांना दिला जाणारा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार व आचार्य अत्रे सर्वोकृष्ट पत्रकारिता पुरस्काराचे वितरण रविवार, दि. २६ जून रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात आयोजित करण्यात येणार आहे.

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते, पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी दिली. या समारंभास सर्वश्री आमदार अरुण लाड, जयंत आसगावकर, विनय कोरे, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, राजेश पाटील, राजू आवळे, ऋतुराज पाटील व जयश्री जाधव हे उपस्थित राहणार आहेत.