कसबा बावडा (प्रतिनिधी) : या हंगामात गळीतासाठी येणाऱ्या ऊसाला एकरक्कमी एफआरपी देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अशी माहिती छ. राजाराम कारखान्याचे मार्गदर्शक संचालक माजी आ. महादेवराव महाडिक यांनी दिली.

महाडिक म्हणाले की, कारखान्याचा गळीत हंगाम २०२१-२२ लवकरच सुरू होणार आहे. या वर्षाची पूरस्थिती आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करून तसेच कारखान्याची या हंगामाची एकूण एफआरपी ३४५३.९० प्रति मे. टन इतकी होत आहे. त्यामधून २०२०-२१ गाळप हंगामाचा सरासरी ऊस तोडणी वाहतुक खर्च ६१३.९० रुपये प्रति मे. टन वजा जाता निव्वळ देय एफआरपी २८४० रुपये प्रति मे. टन इतकी येत आहे. ती ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

यावेळी कारखान्याचे चेअरमन दिलीप पाटील, व्हा. चेअरमन वसंत बेनाडे, कार्यकारी संचालक प्रकाश चिटणीस, अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.