कसबा बावडा (प्रतिनिधी) : मागील दोन दिवसांपासून सुरु असलेल्या जोरदार पावसाने पंचगंगा नदीवरील कसबा बावडा येथील पुन्हा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे राजाराम बंधारा यावर्षी ५ वेळा पाण्याखाली गेला. यावर्षी आतापर्यंत राजाराम बंधारा ६० दिवस पाण्याखाली राहिला आहे. आज (गुरुवार) बंधाऱ्याचे पाणीपातळी १७ फूट ३ इंच इतकी आहे. यंदा १ जून ते १५ ऑक्टोबर या १३५ दिवसात एकूण ६० दिवस हा बंधारा पाण्याखाली राहिला आहे.
आनंदराव पाटील-चुयेकर यांनी गोरगरिबांचे संसार समृद्ध केले : ना. हसन मुश्रीफ
कोल्हापूर (प्रतिनिधी) : गोकुळ दूध संघाचे संस्थापक अध्यक्ष, कै. आनंदराव पाटील- चुयेकर यांनी दूध व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरिबांचे संसार सुखी व समृद्ध केले. प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी जिल्ह्यात खऱ्या अर्थाने धवलक्रांती रुजवली आणि ती यशस्वी केली,...
…अन्यथा, ‘सीपीआर’मधील डीनच्या कार्यालयास टाळे ! : संजय पवार (व्हिडिओ)
भूलतज्ज्ञ नसल्याच्या कारणावरून सीपीआरमधील हदय शस्त्रक्रिया बंद आहेत. यामुळे आज जिल्हा शिवसेनेच्या वतीनं सीपीआरमधील डीनच्या कार्यालयासमोर निदर्शनं करीत शस्त्रक्रिया त्वरित सुरू करण्यासाठी आक्रमक पद्धतीने इशाराही देण्यात आला.
संभाजी ब्रिगेडतर्फे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन उत्साहात… (व्हिडिओ)
कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात आज (शनिवार) संभाजी ब्रिगेडच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांचा ३४१ वा राज्याभिषेक दिन अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर संभाजी महाराजांच्या पुतळ्यास जलाभिषेक घालून...
कोरोनामुक्तीच्या दिशेने पहिले पाऊल : जिल्ह्यात उत्साहात लसीकरणास प्रारंभ (व्हिडिओ)
जिल्ह्यात अकरा ठिकाणी कोरोना लसीकरणास आज प्रारंभ झाला. कसबा बावड्याच्या सेवा रुग्णालयातील परिचारिका अक्षता माने लसीकरण केंद्राच्या पहिल्या लाभार्थी ठरल्या.
राजाराम कारखान्याच्या अपात्र सभासदांना हायकोर्टाचा दिलासा
टोप (प्रतिनिधी) : राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी राजाराम साखर कारखान्याच्या अपात्र सभासदांबाबतचा अंतिम निर्णय चार आठवड्यामध्ये द्यावा, त्यानंतरच कारखान्याच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे छत्रपती...