मुंबई (प्रतिनिधी) : राज्याता कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. त्यामुळे  एमपीएससीची रविवारी (दि. ११) होणारी परीक्षा रद्द करून लांबणीवर टाकण्यात यावी, अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा केल्याचे  मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले.    

अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आहेत. यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे फोनवरुन केली आहे. दरम्यान, याआधी या परीक्षेची तारीख पुढे ढकलण्यात येणार होती. पण  विद्यार्थ्यांचा विरोध लक्षात घेता ही परीक्षा ११ एप्रिलरोजीच होणार असल्याचे सांगण्यात आले होते. परीक्षा वेळापत्रकानुसारच होण्यासाठी राज्य सरकारने योग्य ती खबरदारी आणि उपाययोजना केल्याचे सांगितले जात आहे.