राज ठाकरेंचा शरद पवारांना फोन ; पण…

0
72

मुंबई (प्रतिनिधी) : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना आज (शुक्रवार) फोन केला. राज ठाकरेंचा फोन आल्याची माहिती स्वत: शरद पवार यांनी दिली आहे. मात्र, भेटीबाबत काही ठरलेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

वाढीव वीज बिले आणि शेतकऱ्यांच्या दूध दराच्या मुद्द्यावर राज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी राज्यपालांनी त्यांना शरद पवारांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार राज ठाकरे यांनी शरद पवारांशी फोनवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. राज्यपालांनी आपल्याशी बोलण्याचा सल्ला दिला आहे, असे ते फोनवर म्हणाल्याचे पवारांनी सांगितले.