‘एमपीएससी’ परीक्षेसाठी वयोमर्यादा वाढवा : मराठा महासंघ 

0
11

कोल्हापूर (प्रतिनिधी) : सध्या राज्यसेवा २०२१ पूर्व परीक्षेच्या जाहिरातींमध्ये सर्वसाधारण वर्गासाठी वयोमर्यादा ३८ छापून आली आहे. परंतु पावसाळी अधिवेशनात ठराव करुन ही वयोमर्यादा ४३ केली आहे. यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन देऊन ही वयोमर्यादा वाढवण्यात यावी व पुन्हा जाहिरात प्रसिध्द करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, युवक जिल्हा अध्यक्ष अवधूत पाटील, विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष प्रतिकसिंह काटकर, महादेव पाटील, राजू परांडेकर, प्रताप नाईक, संभाजीराव पाटील आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.