मुंबई (प्रतिनिधी) :  मुसळधार पावसाने केरळमध्ये हाहाकार माजवला आहे. अनेक घरांमध्ये कंबरेएवढं पाणी आहे. तर रस्त्यांना अक्षरश: नदीचं स्वरूप आलं आहे. अनेक गावांमध्ये महापुरानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कोट्टयम जिल्हातील कोट्टक्कल भागात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि महापुराने कहर केला. तिथल्या परिसरात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. 

या भूस्खलनात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी पोलीस आणि एनडीआरएफचे पथक दाखल झाले आहे. त्यांनी आतापर्यंत पंधराहून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं आहे. तर अद्याप बरेच लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

केरळ पट्ट्यामध्ये मासेमारांनाही समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला. शनिवारप्रमाणेच रविवारीही इथे जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ज्यामुळं केरळमधील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.