कोल्हापूर (प्रतिनिधी) : शहर आणि जिल्हयात परतीच्या पावसाचा जोर कायम आहे. यामुळे अजूनही जिल्ह्यातील ९ बंधाऱ्यांवर पाणी आले आहे.

या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू आहे. शुक्रवारी सकाळी ७ पर्यंतच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून एक हजार तर अलमट्टी धरणातून ४६ हजार ५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे, जंगमहट्टी, चिकोत्रा मध्यम प्रकल्प आणि दूधगंगा मोठा प्रकल्प, कुंभी मध्यम प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील खडक कोगे व दूधगंगा नदीवरील दत्तवाड असे एकूण नऊ बंधारे पाण्याखाली आहेत. कोयना धरणात १०५.१५ टीएमसी आणि अलमट्टी धरणात १२३.०८१ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा दशलक्ष घनमीटरमध्ये असा : तुळशी ९८, वारणा ९७४, दूधगंगा ७१९, कासारी ७८, कडवी ६९.५५, कुंभी ७६.५२, पाटगाव १०५.२४२, चिकोत्रा ४३.११५, चित्री ५३.४१४, जंगमहट्टी ३४.६५१, घटप्रभा ४४.१७०, जांबरे २३.२३०