कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापुरात कळंबा परिसरातील पावरग्रीडकडे जाणाऱ्या रोडवर उन्ने फार्महाऊस नजीक सुरू असलेल्या बेकायदेशीर तीन पानी जुगार अड्यावर करवीर पोलिसांनी काल (रविवार) रात्री उशीरा छापा टाकून कारवाई केली.

याप्रकरणी १२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांना नोटीस बजावून सोडून देण्यात आले. तर अड्डा मालक दिंगबर पाटील यांच्यासह १३ जणांवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याच्यांकडून ३१ हजार १६० रुपये रोख रक्कम आणि मोबाईल, पत्यांची पाने असा १ लाख १६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामध्ये विक्रम बजागे (वय ३३, रा.पडळवाडी ता.करवीर), अल्ताफ सरदार बागवान (वय ३६, रा.लक्षीतीर्थ वसाहत, कोल्हापूर), आकाश राजेंद्र सुर्यवंशी (वय २७, कळंबा ता. करवीर), वैभव विक्रम कुलकर्णी (वय २७ रा. राजोपाध्येनगर कोल्हापूर), सुजीत शंकर सातपुते (वय २१, रा. कोतोली ता. पन्हाळा), सागर मारुती यादव (वय २५ रा. उंड्री, ता.पन्हाळा), प्रतिराज सुरेश पोकर (वय २८, रा. सानेगुरुजी वसाहत, कोल्हापूर), दत्तात्रय आनंदराव खुडे (वय ४०, रा. शिरगाव, ता. राधानगरी), रोहन अशोक भोसले (वय ३२, लक्षीतीर्थ वसाहत), विश्वास सदाशिव जगताप (वय ४८, रा. कळंबा), जयदीप राजाराम अतिग्रे (वय ३१, रा. पडळवाडी), बाबुराव गवळी (वय ४४, रा. चंबुखडी ता.करवीर) असे अटक करून नोटीस बजावून सोडून देण्यात आलेल्यांची नावे आहेत.