हातकणंगले (प्रतिनिधी) : केंद्र शासनाने बंदी घातलेल्या तारखेनंतर फोरेट या कीटकनाशकाची बेकायदा विक्री व साठा करणाऱ्या कुंभोज येथील बापूसो कृषी सेवा केंद्र या दुकानावर राज्यस्तरीय गुण नियंत्रक पथकाने धाड टाकून १८७ किलो फोरेट जप्त केले. ही कारवाई आज (शनिवार) दुपारी करण्यात आली. त्यामुळे बी-बियाणे, खते विक्री करणाऱ्या दुकानदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

या दुकानदारासह JBC crope science vapi (Gujarat) आणि Gujarat kisan fertilizer या कंपन्यांवर व संबंधित वितरकावर हातकणंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तंत्र अधिकारी गुण नियंत्रक बंडा कुंभार यांनी याबाबत फिर्याद दिली. या कारवाईत विभागीय कृषी सहसंचालक उमेश पाटील, कृषी उपसंचालक अशोक बानखेले, प्रवीण कदम, विशिष्ट गुण नियंत्रक प्रल्हाद साळुंखे व नंदकुमार मिसाळ या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

यापुढे कोणीही व्हाॅट्सॲप वा फेसबुकवरील भूलथापांना बळी न पडता कायद्याने नोंदीत व शिफारशीत केलेली किटकनाशके अधिकृत परवानाधारकाकडूनच खरेदी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.