इचलकरंजीमध्ये जुगार अड्ड्यावर छापा : अकराजणांना अटक

0
49

इचलकरंजी (प्रतिनिधी) : इचलकरंजीजवळील कबनूर येथील फरांडे मळ्यातील ओमकार चौकातील जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी अकराजणांना अटक केली. अड्डामालक नाजरुद्दिन जमादार पळून गेला या वेळी चार मोटारसायकलींसह दोन लाख पन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. इचलकरंजी विभागाचे पोलीस उपअधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या पथकाने ही कारवाई केली.