कांडगाव येथे जुगार अड्ड्यावर छापा : ११ जणांना अटक

0
104

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर- राधानगरी रोडवरील कांडगाव (ता. करवीर) परिसरात जुगार व बेकायदेशीर दारू अड्ड्यावर छापा टाकून ११ जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ४० हजार ९७० रोख रक्कम, देशी -विदेशी दारू, ११ मोबाईल हँडसेट, ४ मोटारसायकल, १ जिप्सी गाडी असा ३ लाख ८ हजार ९११ रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना न्यायालयात हजर केले असताना तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने करण्यात आली.

विजय लहू पाटील, पांडुरंग चव्हाण, उद्य चव्हाण, सागर घोटणे, अमित लोखंडे, अमित भट (सर्व रा. कांडगांव, ता. करवीर), दत्तात्रय पाटील, विजय पाटील, शहाजी पाटील, अनिल लोखंडे (रा. देवाळे), यूवराज पाटील (रा. वाशी) अशी अटक केलेल्याची नांवे आहेत.

अवैध मटका व्यवसाय चालविणारा विजय पाटील यांच्यावर १६० गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरूपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यराज घुले, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे यांच्यासह पथकाने केली.