कळे (प्रतिनिधी) : पन्हाळा तालुक्यातील कळे येथे मटका अड्डयावर छापा टाकून सतिश पांडूरंग कुंभार (वय ४०, रा. डवंग गल्ली, कळे), तानाजी हिंदूराव जाधव (रा. कळे, ता. पन्हाळा), विश्वास शंकर कुरणे  (वय ५०, रा. कळे, डवंग गल्ली, ता. पन्हाळा), करण माने (रा. कोल्हापूर) यांना  गुन्हे अन्वेषण पथकाने रंगेहाथ पकडले. याबाबतची फिर्याद पो. कॉ. सोमराज पाटील आणि पो.कॉ. रविंद्र कांबळे यांनी दिली आहे.

पोलीसातून दिलेल्या माहितीनुसार, कळे येथे डवंग गल्ली कमानीजवळ  मटका घेत असल्याचे गुन्हे अन्वेषण पथकाला माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी काल (सोमवार) आठच्या सुमारास छापा टाकला. त्यावेळी सतिश कुंभार आणि तानाजी जाधव यांच्याकडून ८,५०२ रूपये तसेच विश्वास कुरणे आणि करण माने यांचेकडून ८,१४२ रुपये, मटका जुगाराचे  इतर साहित्य, मोबाईल असा एकूण १६,६४४ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या चौघांवर कळे पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदयानुसार गुन्हा नोंद झाला आहे. ही कारवाई सपोनि. शिवानंद कुंभार, विजय गुरखे, रफिक आवळकर, शिवाजी जामदार, रणजित पाटील यांनी केली.