यड्राव येथील जुगार अड्यावर छापा

0
112

इचलकरंजी (प्रतिनिधी): यड्राव येथील पार्वती इंडस्ट्रीजमध्ये असणाऱ्या हॉटेल अॅकॅाडेवर तीनपानी जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांचा छापा टाकला. या कारवाईत तीन चाकी वाहने, ६ मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम ३,२४८०० रूपये असे एकूण २४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी संतोष गोपाल शेट्टी (वय ५३ रा. इचलकरंजी), विनोद चव्हाण (वय ४९ रा. सांगली), नासीर नदाफ (वय ४८ रा. सांगली), विशाल माळी (वय ४५ रा. सांगली), संतोष खामकर (वय ४५ रा. जयसिंगपूर) व रमेश बावचे (वय ३३ रा. आगर) या सहा जणांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत सांगली, जयसिंगपूर, इचलकरंजी शहरातील जुगार खेळणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्यासह त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.