पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी) : पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षांच्या स्वीय सहायकाच्या कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज (बुधवारी) सायंकाळी ५ च्या सुमारास छापा टाकला. या कारवाईमुळे महापालिका परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.

स्थायी समितीची आज दुपारी ऑनलाइन साप्ताहिक बैठक झाली. सायंकाळी ५ च्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थायी समिती अध्यक्षांचे स्वीय सहायक ज्ञानेश्वर पिंगळे यांना महापालिका आवारात ठेकेदाराकडून पैसे घेताना रंगेहाथ पकडले. त्यानंतर तिसऱ्या मजल्यावरील पिंगळे यांच्या कक्षात त्यांच्यासह ४ जणांची चौकशी केली. मात्र, त्यांनी किती रक्कम स्वीकारली, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, २ लाख रुपये घेतल्याचे समजते.