मनपाडळेच्या सरपंचपदी रायबाराजे शिंदे, उपसरपंचपदी उल्हास वाघमारे…

0
72

टोप (प्रतिनिधी) :  हातकणंगले तालुक्यातील मनपाडळे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रायबाराजे शिंदे तर उपसरपंचपदी उल्हास वाघमारे यांची आज (मंगळवार) बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी एल.एस.मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.

सरपंचपदासाठी सर्वसाधारण पुरुष रायबाराजे शिंदे यांचा तर उपसरपंचपदी उल्हास वाघमारे यांचा विहित वेळेत अर्ज दाखल झाल्याने दोघांचीही बिनविरोध निवड झाल्याचे अध्यक्षांनी जाहीर केले. यावेळी आर.बी.पाटील ग्रामसेविका एस.ए. दुधगांवकर यांनी सचिव म्हणून काम पाहिले.

यावेळी हंबीरराव शिंदे, विठ्ठल सुर्यवंशी, संजय पाटील, बाळाताई गुरव, शिल्पा पाटील, अरुणा वाघमारे, सुनिता सुतार, निता कुरणे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.